ताज्या बातम्या

SBI Customers Alert : नवीन नियम लागू! एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या, नाहीतर बसेल आर्थिक फटका

SBI Customers Alert : जर तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण बँकेने आणखी एक नियम लागू केला आहे. हा नियम एटीएमशी संबंधित आहे.

बँकेने आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे पैसे काढण्यापूर्वी हा नियम जाणून घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.

बँकेच्या या नवीन नियमानुसार, ग्राहकांना आता ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाही. पैसे काढण्यासाठी आता ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. OTP टाकल्यानंतरच त्यांना पैसे काढता येतील.

‘एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी-आधारित रोख काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. SBI ग्राहकांनी OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल हे जाणून घेतले पाहिजे’ असे एसबीआयने म्हटले आहे.

हे लक्षात घ्या की नवीन नियम केवळ 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी लागू केले आहे. पैसे काढताना ग्राहकांना डेबिट कार्ड पिनसह OTP टाकणे बंधनकारक असणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

  • OTP हा चार अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी पाठवला जाईल.
  • रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर ओटीपी टाकण्यास सांगितले जाईल.
  • शेवटी तुम्हाला बँकेकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा लागेल.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts