ताज्या बातम्या

New Rules : कामाची बातमी ! नवीन वर्षात बँक लॉकर ते GST पर्यंत ‘ह्या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल जाणून घ्या नाहीतर ..

New Rules : अवघ्या काही दिवसानंतर  आपण नवीन वर्षात दाखल होणार आहे. या नवीन वर्षात आपल्या खिश्या संबंधित काही महत्वाचे नियम बदलणार आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला ह्या बदलणाऱ्या काही नियमांची माहिती देणार आहोत.

जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या बदलांमध्ये बँक लॉकर्स, क्रेडिट कार्ड, GST ई-इनव्हॉइसिंग, हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि CNG-PNG किमतींचा समावेश आहे.

बँक लॉकरचे नवीन नियम

RBI ने जारी केलेले बँक लॉकरचे नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत. त्यांच्या अंमलबजावणीनंतर बँका लॉकर्सच्या संदर्भात मनमानीपणे काहीही करू शकणार नाहीत. तसेच लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल. यासोबत जर तुमचे बँकेत लॉकर असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत नवीन करार करावा लागेल. यासाठी बँका ग्राहकांना एसएमएस आणि इतर माध्यमातून नियमातील बदलाची माहिती देत आहेत.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

जर तुम्ही बिल पेमेंट आणि खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हा बदल तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचे धोरण काही बँका बदलू शकतात. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी 31डिसेंबरपूर्वी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट रिडीम करणे महत्त्वाचे आहे.

जीएसटी ई-इनव्हॉइसिंग

जीएसटी ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल संदर्भातही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2023 पासून, ई-इनव्हॉईस तयार करण्याची मर्यादा 20 कोटींवरून 5 कोटी रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ आता पाचपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना जीएसटी पोर्टलवरून इलेक्ट्रॉनिक बिले तयार करावी लागणार आहेत.

हाय सिक्योरिटी नंबर प्लेट

31 डिसेंबर 2022 ही देशातील अनेक राज्यांमध्येहाय सिक्योरिटी नंबर प्लेट बसविण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेपूर्वी तुम्ही तुमच्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नाही, तर तुम्हाला चालान केले जाऊ शकते. मात्र, त्याची तारीख राज्य सरकारांनी अनेकवेळा वाढवली आहे.

एलपीजी किंमत

देशात प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीच्या किमतीत सुधारणा केली जाते. अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2023 रोजी एलपीजीच्या किमतीत बदल शक्य आहे.

हे पण वाचा :- Cars Price Hike : आता .. ‘ही’ कंपनी देणार ग्राहकांना जोरदार धक्का ! ‘ह्या’ कार्स खरेदीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts