ताज्या बातम्या

नितीन गडकरींची संसदेत केली मोठी घोषणा, 3 महिन्यांत ‘हे’ अवैध टोलनाके बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार येत्या 3 महिन्यांत अनेक अवैध टोलनाके बंद करणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, देशात 60 किमीपेक्षा कमी अंतरावर टोलनाका असू शकत नाही. मात्र अनेक ठिकाणी असे टोलनाके सुरू आहेत. तसेच पुढे गडकरी म्हणाले की, आज मी सभागृहाला आश्वासन देतो की सरकार असे सर्व टोलनाके येत्या 3 महिन्यांत बंद करणार आहे. कारण हे चुकीचे कृत्य असून असे टोलनाके चालवणे बेकायदेशीर आहे.

आधार कार्डवरून टोल पास बनवला जाईल – देशाच्या अनेक भागात, लोकांना जवळच्या किंवा अगदी कमी अंतराच्या प्रवासासाठीही टोल भरावा लागतो, कारण नवीन रस्ते आणि महामार्ग बांधल्यामुळे त्यांच्या गावांच्या अंतरादरम्यान टोलनाके होतात. या समस्येवर तोडगा काढण्याबाबत सभागृहाची सूचना स्वीकारत नितीन गडकरी म्हणाले की, सरकार त्या भागातील लोकांना आधार कार्डानुसार पास जारी करेल.

6 एअरबॅग अनिवार्य केल्या – नितीन गडकरी यांनी सभागृहात सांगितले की, देशात रस्ते सुरक्षा वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही सरकारच्या वतीने हे काम केले आहे की, आता देशात कोणतेही वाहन बनवल्यास त्यात 6 एअरबॅग अनिवार्य असतील. तसेच आम्ही रस्ते अभियांत्रिकी सुधारण्यासाठी देखील काम करत आहोत.

पुढे ते म्हणाले की, सध्या जगातील 11 टक्के अपघात भारतात होतात. दरवर्षी सुमारे 5 लाख लोक रस्ते अपघातांना बळी पडतात, ज्यामध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. ते खाली आणण्याचा आग्रह धरावा लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts