ताज्या बातम्या

ना जेल ना बेल, अविनाश भोसलेंसाठी कोर्टाचा वेगळाच आदेश

Maharashtra news : न्यायालयासमोर आरोपीला हजर केल्यानंतर साधरणपणे एक तर त्याची रवानगी कोठडीत केली जाते किंवा जामिनावर सुटका केली जाते.

मात्र, पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्याबाबतीत वेगळाच आदेश दिल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

भोसले यांना काल रात्री सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने उद्योगपती भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

त्यानुसार भोसले यांना सीबीआयच्या सांताक्रुज येथील गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. या काळात भोसेल यांना त्यांचे वकील आणि परीवारातील एक सदस्यच भेटू शकणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts