ताज्या बातम्या

Big news | सायबर गुन्हेगारांची आता खैर नाही, यंत्रणा झाली सक्षम

AhmednagarLive24 : सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे. तिचा परिपूर्ण वापर करावा तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला.

धार्मिक भावना भडकाविणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटविणे आवश्यक असते. सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम फायरवॅाल्स तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts