अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत.
यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून प्रमाणपत्र मिळणार… तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी करू शकता.
त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.
जाणून घ्या नवीन नियमांबाबत :- अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांना किमान एक एकर जागा असली पाहिजे,
तर मध्यम आणि अवजड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा असणे आवश्यक आहे. ट्रेनर किमान १२वी पास असावा आणि त्या व्यक्तिला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असला पाहिजे, व वाहतूक नियमांची जाण असावी.
मंत्रालयाने अध्यापनाचा अभ्यासक्रमही ठरवून दिला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल ४ आठवडे २९ तासांपर्यंत असेल. तसेच या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम लेखी आणि प्रॅक्टिकल अशा २ भागांमध्ये विभागला जाईल.
लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतार इत्यादींवर वाहन चालवायला व शिकण्यासाठी २१ तास घालवावे लागतात.
यात लेखी भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ८ तासांचा असेल, यामध्ये रस्ता शिष्टाचार समजून घेणे, रस्त्यावरील वाहन चावण्याचा अंदाज, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा यासर्वांचा अभ्यास क्रमात समावेश असेल.