ताज्या बातम्या

“उचलली जीभ लावली टाळ्याला असे कुणीही करू नये”

पुणे : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर (Central Goverment) हल्लाबोल केला आहे. तसेच भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर देखील पुण्यात बोलत असताना केली आहे. संजय राऊत यांचा सध्या शिवसेना मेळाव्यानिमित्त पुणे (Pune) दौरा सुरु आहे.

संजय राऊत केंद्रावर टीका करताना म्हणाले, देशात ज्याप्रकारची राजवट सुरू आहे, त्यावरून असे वाटते की इंग्रजांची राजवट सुरू आहे अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा चांगली होती असेही राऊत म्हणाले आहेत.

औरंगाबादच्या मराठवाडा सांकृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक सभा झाल्या आहेत. काल कोणी सभा घेतली म्हणून शिवसेनेची तिथे सभा होत नाही.

तर गर्दीने ओसंडून जाणाऱ्या सभा तिथे घेतल्या जातील. शिवसेनेने जिथे जिथे सभा घेतल्या तिथे इतिहास झाला असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, जे टीका करत आहेत, त्यांचे स्थान काय आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे कुणीही करू नये. आपला पूर्वइतिहास तपासून आपण राजकारणावर बोलायला हवे.

कोण बोलत आहे, त्या बोलणाऱ्याची भूमिका काय, राजकारणातले, समाजकारणातले स्थान काय, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असे प्रश्न उपस्थित करत पडळकरांवर संजय राऊतांनी टीका केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts