अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-नगर मतदार संघातील रा.मा. ६७ (श्रीगोंदा -शिरुर रोड) ते अरणगाव दुमाला लबडेवस्ती ३.४० कि.मी. रस्तासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रक्कम रु. १६३.१४ लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला आहे.
या कामांचे भुमीपुजन मा. आमदार तथा जिल्ह्या सहकारी बॅंकेचे संचालक राहुलदादा जगताप पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सभापती शंकरराव पाडळे, पंचायत समिती सदस्य अतुलशेठ लोखंडे, मोहनराव आढाव, सुभाषराव कुटे, गुलाबराव आढाव,
दत्तात्रय दिवटे, सोनबा आढाव, गणेश बोबडे, मनोहर शिंदे, आढाव सर, एल.बी. शिंदे, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब वाळके, विक्रम सातव, बाळासाहेब लबडे, प्रमोद दिवटे, विठ्ठल लबडे तसेच अरणगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना जगताप म्हणाले की, थापा मारण्याचे व नारळ फोडण्याचे काम मी करत नसुन प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय कधीही नारळ फोडत नाही.
मला माझ्या जनतेवर विश्वास आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मी आमदारकीचा उपयोग केला आहे. मी नारळ फोडण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कुठलेही काम करत नाही. जी कामे मी मंजुर केलेली आहेत त्या कामांचे श्रेय देखील इतरांनी घेण्याचा केवीलवाना प्रयत्न करु नये.
या परिसरातील उर्वरीत मागणी असणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी देखील वेगवेगळ्या विभागामार्फत पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल व ती कामे देखील लवकर होतील. आता काम व दर्जा चांगल्या प्रकारे करुन घेण्याची जबाबदारी येथील स्थानिक नागरीकांची आहे. त्यांनी लक्ष घालुन काम चांगल्या प्रकारे करुन घ्यावे.
अनेक वर्षापासूनची येथील ग्रामस्थांनची मागणी मंजुर झल्यामुळे ग्रामस्थांनी मा.आ. राहुलदादा जगताप यांचे आभार व्यक्त केले.