जळगाव : देशात महागाई (Inflation) वाढतच चालली आहे. ती काही थांबायचे नाव घेत नसल्यचे सध्या तरी चित्र दिसत आहे. पेट्रोल डिझेलपासून ते खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच घरगुती गॅस सिलिंडर (Gas cylinder) सुद्धा वाढला आहे.
या महागाईमध्ये सर्वसामान्य लोक भरडले जात आहेत. सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित विसकटले आहे. मात्र कोणताच राजकीय पक्ष महागाई विरोधात ठोस भूमिका घेयला तयार नाही. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मात्र महागाईचे समर्थन केले आहे.
इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन (Inflation support) करण्याचे धाडस करणार नाही, मात्र मी ते धाडस करतो. मला सांगा महागाई कुठे आहे? सोने 20 हजार रुपये तोळ्यावरून 50 हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत.
महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का असा प्रश्नही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, उलट कांदा, डाळींच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असे खोत म्हणाले आहेत.
काँग्रेस (Congress) पक्षाकडून भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. काँगेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन देखील करण्यात आले होते. घरगुती वापरायचा गॅस सिलिंडर वाढल्यामुळे महिलांचीही आर्थिक बजेट ढासळले आहे.
घरगुती वापरायचा गॅस सिलिंडर मध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जवळपास १००० रुपयांच्या आसपास त्याची किंमत पोहोचली आहे. याच वाढत्या महागाईमुळे सर्वजण हैराण झाले आहेत.