Smart Glasses: नॉइज (Noise) ने भारतात पहिले स्मार्ट आयवेअर (Smart eyewear) लाँच केले आहे. कंपनीने याचे नाव Noise i1 असे ठेवले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नॉईज लॅबमध्ये हे आयवेअर विकसित करण्यात आले आहे. हा स्मार्ट ग्लास वापरकर्त्यांना अनोखा ऑडिओ अनुभव देईल.
Noise i1 किंमत आणि उपलब्धता –
नॉईज i1 स्मार्ट आयवेअर 5,999 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हे उपकरण gonoise.com वरून ऑनलाइन खरेदी (Buy online) केले जाऊ शकते. हे मर्यादित संस्करण उपकरण आहे. यामुळे साठा मर्यादित राहील.
नॉइज i1 ची वैशिष्ट्ये –
कंपनीने सांगितले आहे की, नॉईज i1 स्मार्ट आयवेअर फक्त भारतातच बनवण्यात आले आहे. म्हणजेच हे मेड इन इंडिया उपकरण (Made in India equipment) आहे. या उपकरणामध्ये मोशन एस्टिमेशन, मोशन कंपेन्सेशन, कॉलिंगसाठी मायक्रोफोन, मॅग्नेटिक चार्जिंग (Magnetic charging), हँड्स फ्री व्हॉईस कंट्रोल आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत.
या स्मार्ट आयवेअरमध्ये गाईडेड ऑडिओ डिझाइन (Guided audio design) देण्यात आले आहे जे कानापर्यंत योग्य संगीत प्रवाह राखते. कंपनीचा दावा आहे की हे उपकरण आसपासच्या आवाजाला देखील अवरोधित करते, ज्यामुळे वापरकर्त्याला इमर्सिव ऑडिओ अनुभव मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी Noise i1 मध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.1 सपोर्ट करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी एका चार्जवर 9 तास चालते. या स्मार्ट इअरवेअरमध्ये फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करण्यात आला आहे.
कंपनीने म्हटले आहे की, 15 मिनिटांच्या चार्जवर 120 मिनिटांपर्यंत संगीत प्लेबॅक देते. या स्मार्टवेअरमध्ये मल्टी फंक्शन टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत. यासह, वापरकर्ते कॉल स्वीकारणे किंवा नाकारण्याव्यतिरिक्त संगीत व्यवस्थापित करू शकतात किंवा व्हॉइस असिस्टंट सक्रिय करू शकतात.
कंपनीचा दावा आहे की, हा ग्लास लॅपटॉप वापरताना यूव्ही किरण आणि ब्लू लाइट फिल्टरपासूनही तुमचे संरक्षण करतो. यात पाणी आणि स्प्लॅश प्रतिरोधकांसाठी IPX4 रेटिंग आहे.