ताज्या बातम्या

Noise Smartwatch : दमदार फीचरसह Noise च्या स्मार्टवॉचची भारतात एन्ट्री, इतक्या स्वस्तात खरेदी करता येणार

Noise Smartwatch : ग्राहक ज्या स्मार्टवॉचची सर्व आतुरतेने वाट पाहत होते अखेर ते स्मार्टवॉच म्हणजे Noise ColorFit Vivid भारतात लाँच झाले आहे. आपल्या सर्व स्मार्टवॉचप्रमाणे कंपनीकडून यात दमदार फीचर देण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही स्वस्तात उत्तम फीचर्स असणारे स्मार्टवॉच शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण या स्मार्टवॉचची किंमत 1,699 रुपये इतकी आहे. तुम्ही आता मेटॅलिक फिनिशिंगसह अप्रतिम प्रीमियम स्मार्टवॉच खरेदी करू शकता.

कंपनीच्या नवीन स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त क्लाउड आधारित स्मार्टवॉचचे चेहरे देखील आहेत. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा दिली आहे. त्यामुळे यात इन-बिल्ट माइक आणि स्पीकरही असणार आहेत. Noise ColorFit Vivid Call ची बॅटरी 260 mAh असून हे फक्त सिंगल चार्जमध्ये 7 दिवस चालते.

किती असणार किंमत

या स्मार्टवॉचची भारतात किंमत 1,699 रुपये ठेवली आहे. जर तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर ते तुम्ही नॉईजच्या अधिकृत साइट आणि अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. यात 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 240×280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसेच कंपनीने यात हार्ट रेट सेन्सर आणि हेल्थ ट्रॅकिंगसाठी ब्लड ऑक्सिजन सेन्सर उपलब्ध करून दिला आहे. यात मेटॅलिक फिनिश डिझाइनसह ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट दिला असून यात स्लीक डिझाइनसह मेटॅलिक फिनिशिंग दिले आहे.

तसेच जर तुम्हाला तुमच्या आरोग्याशी निगडीत दैनंदिन निरीक्षण करायचे असल्यास हे स्मार्टवॉच तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बऱ्याच वेळा लोक हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजनसाठी स्वतंत्र मशीन खरेदी करतात जे खूप महाग असते. मात्र हे स्मार्टवॉच ही दोन्ही कामे अगदी सहज करू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts