ताज्या बातम्या

WhatsApp feature : आता चॅटिंग होणार आणखी मजेशीर! लवकरच येणार जबरदस्त फीचर

WhatsApp feature : आता वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप वापरताना आणखी मजा येणार आहे. कारण कंपनी फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्डिंगशी निगडित एक उत्तम फीचर आणत आहे.

ज्याचे नाव ‘फॉरवर्ड मीडिया विथ कॅप्शन’ असे आहे. या फीचरवर सध्या काम सुरु असून लवकरच ते वापरकर्त्यांना वापरता येईल. त्यामुळे चॅटिंग आणखी मजेशीर होणार आहे.

नवीन फीचरसह, फॉरवर्ड केलेल्या मीडिया फाइल्स देखील कीवर्डसह तुमच्या चॅटमध्ये शोधाव्या लागणार आहेत. आपल्या यूजर्सना फीचरची माहिती मिळावी यासाठी व्हॉट्सअॅप अलर्ट पाठवत आहे. कंपनी सध्या ते अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.23.2.2 मध्ये देत आहे. हे फिचर प्रथम iOS साठी जारी करण्यात आले.

गायब होणारे मेसेज सेव्ह होणार

कंपनी सध्या आणखी एका नवीन फीचरवर काम करत असून त्यामुळे गायब होणारे मेसेज सेव्ह होतील. या आगामी फीचरचे नाव kept message असे आहे. WABetaInfo ने काही दिवसांपूर्वीच या फीचरची माहिती दिली होती तसेच स्क्रीनशॉटही शेअर केला होता. गायब होणारे मेसेज ऑन करून पाठवलेले मेसेजही चॅटमध्ये बुकमार्क केले जाणार आहेत.

WABetaInfo नुसार, कंपनी सध्या हे फीचर तयार करत आहे. येत्या काही दिवसांत ते बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जाऊ शकते. बीटा चाचणी पूर्ण झाल्यावर, कंपनी त्याची स्थिर आवृत्ती रोलआउट होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts