आता ‘ग्रामसुरक्षा समिती’ मैदानात!

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसुरक्षा समितीने व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावातील नियम मोडणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी.

कोरोनाच्या प्रसाराला आपणच जबाबदार नाहीत ना असा विचार प्रत्येकाने करावा. ग्रामपंचायतीने व सुरक्षा समितीने गावात केलेल्या कारवाईचा अहवाल रोज पंचायत समितीला द्यावा.

असे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी दिले आहेत. पाथर्डी शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय. रोज ६० ते ७० जण कोरोनाची तपासणी करतात.

त्यामधे साधारणपणे ३० ते ४० रुग्ण कोरोना बाधीत असल्याचे समोर येते आहे. सरकारी दवाखान्यापेक्षा खाजगी रुग्णालयात कोरोना तपासणी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिरसाटवाडी, खरवंडी, मढी येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे.

बाजारपेठेच्या गावात सकाळी नागरिकांची गर्दी जमते आहे. तेथुन कोरोनाचा प्रसार व्हायला संधी मिळते. विवाह व अंत्यविधी मधुन कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो याचा अनुभव मागील काळात तालुक्याने घेतला आहे.

त्याची पुनर्रावृत्ती होवु नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. आता आठवडा बाजार बंद केले आहेत. विवाहासाठी परवानगी बंधनकारक आहे. तरीही गावागावत विवाह समारंभात दोनशे ते पाचशे लोक विवाहासाठी जमत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts