अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-आतापर्यंत शेतकरी अनेक आस्मानी संकटे झेलत असताना अजूनही त्याच्या संकटात भर पडली आहे ती भुरट्या चोरांची.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील तब्बल ५ क्विंटल लिंबं चोरून नेले आहेत .
याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारात अशोक अधोरे यांची व अशोक येडे यांची शेतजमीन असून, दोन्ही ठिकाणी लिंबोणीच्या फळबागा आहेत.
दि.२०फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील लिंबोनीच्या फळबागेतुन तब्बल ५ क्विंटल लिंब चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.