Rear Seat Belt Rule : गाडी चालवत (Driving a car) असताना अनेक जण सीट बेल्ट (Seat Belt) लावत नाहीत. त्यामुळे दरवर्षी रस्ते अपघातात (Accident) लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे.
त्यापैकी कितीतरी मृत्यू (Death) हे सीट बेल्ट न लावल्यामुळे होतात. लोकांनी स्वतःच सीट बेल्ट लावला पाहिजे. परंतु,आता गाडीत मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट (Rear Seat Belt) बंधनकारक करण्यात आला आहे
एक हजार रुपये दंड होईल
दंड (Penalty) टाळण्यासाठी वाहनचालक सीट बेल्ट लावतात, मात्र वाहनाच्या मागील सीटवर बसलेले लोक सीट बेल्ट लावत नाहीत, असे सर्वसाधारणपणे दिसून येते.
तुम्हीही असे करत असाल तर सावध व्हा कारण आता मागचा सीट बेल्ट न लावल्यास दंड भरावा लागणार आहे. रस्ता सुरक्षेचे प्रयत्न तीव्र करत दिल्ली वाहतूक पोलिसांनी बुधवारी मोहीम सुरू केली.
याअंतर्गत वाहनाच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला 1000 रुपये दंड ठोठावला जाईल.
गेल्या वर्षी रस्ते अपघातात 1900 जणांचा मृत्यू झाला होता
रस्ता सुरक्षेचे नियम लक्षात घेता दिल्ली वाहतूक पोलिस सातत्याने मोहीम राबवत आहेत. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सीट बेल्ट घालण्याचे आणि वेगाने गाडी न चालवण्याचे आवाहन केले होते.
अधिकृत आकडेवारीनुसार, चालक किंवा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या वर्षी दिल्लीत रस्ते अपघातात 1900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.