Indian Railways Rules : देशभरातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. परंतु, अनेकदा असे होते की आपल्याला उशीर झालेला असतो आणि आपण तिकिटाच काढायला विसरतो.
त्यामुळे TTE आला तर तुम्हाला संपूर्ण दंड भरावा लागतो. जर तुमच्यासोबतही असे झाले असेल तर तुमच्यासाठी एका आनंदाची बातमी आहे, कारण आता तुम्हाला तिकीट नसतानाही प्रवास करता येणार आहे. रेल्वेनेच हा नियम बनवला आहे. काय आहे नियम जाणून घेऊयात.
या अगोदर अशी तत्काळ तिकिटे फक्त बुकिंगच्या नियमांनुसारच मिळत होती, परंतु त्यातही तिकीट मिळणे गरजेचे नाही. त्यासाठी रेल्वेचा एक विशेष नियम जाणून घ्या. या नियमाअंतर्गत तुम्ही कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रवास करू शकता.
रेल्वेमध्येच तिकीट येणार
नियमांनुसार, जर तुमचे आरक्षण नसेल आणि तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच रेल्वेमध्ये चढू शकता. अशा परिस्थितीत, नंतर ट्रेनमध्ये तिकीट तपासकाकडे जाऊन तुम्ही आरामात तिकीट मिळवू शकता. हा नियम प्रवाशांसाठी रेल्वेनेच केला आहे.
यामध्ये तुम्हाला फक्त एक महत्त्वाचे काम करायचं आहे की प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर तातडीने TTE शी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर TTE तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत तिकीट तयार करेल.
कार्डद्वारेही देता येणार पैसे
तिकीट काढण्यासाठी तुम्ही आता TTE ला कार्डद्वारेही पैसे देऊ शकता. परंतु, जर ट्रेनमध्ये सीट रिकामी नसेल तर TTE तुम्हाला आरक्षित सीट देण्यास नकार देऊ शकते. पण, प्रवास थांबवू शकत नाही.
जर तुमच्याकडे कोणतेच आरक्षण नसेल, तर तुम्ही 250 रुपये दंडासह प्रवासाचे संपूर्ण भाडे भरून तिकीट काढावे. एक असाही नियम आहे की जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव चुकली तर पुढील दोन स्टेशनपर्यंत तुमची सीट TTE कोणालाही देऊ शकत नाही. दोन स्टेशननंतर तुम्ही तुमची जागा घेऊ शकता.