Toll Tax : तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करणार असाल किंवा प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण कालपासून म्हणजे 26 फेब्रुवारीपासून नॅशनल हायवेवरून प्रवास खूप स्वस्त झाले आहे. याबाबत नॅशनल हाय वे अथॉरिटी ऑफ इंडियाने अधिसूचना जारी केली आहे.
केंद्र सरकारने टोल टॅक्स कमी करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून टोलसाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोणत्या गाडीला किती टोल द्यावा लागणार पाहुयात.
याबाबत NHAI कडून देण्यात आली माहिती
टोल टॅक्स करण्याच्या निर्णयामुळे दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमधील लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीने पानिपत-रोहतक राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील टोल कमी केला आहे. याबाबत NHAI ने असे सांगितले की, डहर गावात असलेल्या प्लाझावरील टोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कालपासून लागू झाले नवीनतम दर
डहर टोल प्लाझाचे व्यवस्थापक अभिषेक यांनी याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल टॅक्स कमी केला असून आता नवीन दर 26 फेब्रुवारीपासून म्हणजे कालपासून लागू झाले आहेत. मागच्या वर्षी 1 एप्रिल 2022 रोजी टोल प्लाझाचे दर वाढवले होते, जे आता कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे या लोकांना दिलासा मिळाला आहे.
आता मोजावे लागणार इतके पैसे
नवीन दरांनुसार, आतापासून पानिपत-रोहतक राष्ट्रीय महामार्गावर कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांना एकेरी मार्गासाठी 60 रुपये तर दोन्ही बाजूंसाठी 90 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, यापूर्वी यासाठी 100 आणि 155 रुपये मोजावे लागत होते.
जाणून घ्या नवीन दर
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी या मार्गावरून धावणाऱ्या व्यावसायिक वाहनांना आणि मिनीबसना एका बाजूसाठी 160 रुपये तसेच दोन्ही बाजूंसाठी 235 रुपये मोजावे लागत होते. सरकारच्या या निर्णयामुळे हा दर आता 100 रुपयांवर आणला आहे. दोन्ही बाजूचे दर 150 रुपयांवर आले आहेत.
नवीन दर जाहीर
बस आणि ट्रक चालकांबद्दल बोलायचे झाल्यास या लोकांना पूर्वी एका बाजूसाठी 320 रुपये तर दोन्ही बाजूंसाठी 480 रुपये मोजावे लागत होते, परंतु, आता ते 205 आणि 310 रुपये झाले आहे. तीन एक्सल असलेल्या व्यावसायिक वाहनांना एका बाजूला 225 रुपये आणि दोन्ही बाजूला 340 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच इतर वाहनांसाठीही टोलचे नवीन दर जारी केले आहेत.