ताज्या बातम्या

Agriculture News : काय सांगता! आता मोबाईल अँप्लिकेशनच्या मदतीने बटाट्याच्या पानाच्या फोटोवरचं समजणार रोग; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Krushi news : भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे आणि काळाच्या ओघात आता या शेतीप्रधान देशात मोठा बदल देखील बघायला मिळत आहे.

आता देशातील शेती (Indian Farming) हायटेक बनू पाहत आहे. यासाठी वैज्ञानिक (Agricultural Scientists) तसेच मायबाप शासन (Government) प्रयत्नरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

देशातील वैज्ञानिकांनी (Indian Agricultural Scientists) शेतकऱ्यांना अधिक उत्पादन (Farmers Income) घेता यावे यासाठी आता टेक्नॉलॉजीचा वापर करत बटाटा पिकावरील रोगाचे निदान वेळेत लावण्यासाठी एका विशिष्ट ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

बटाटा रोपाच्या पानाचा फोटोवरूनच आता पिकाला लागलेल्या रोगाची माहिती मिळणे शक्य होणार आहे. हो बरोबर ऐकलं तुम्ही आता हे शक्य होणार आहे.

आयआयटी मंडी आणि सेंट्रल बटाटा रिसर्च सेंटर (सीपीआरआय) शिमला येथील संशोधकांनी एक मोबाइल अँप विकसित केले आहे, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पानाचा फोटो काढताच वनस्पती रोगग्रस्त आहे की निरोगी आहे याची माहिती मिळणार आहे.

नुकतेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्याच्या चाचणीला मान्यता दिली आहे. सामान्यतः बटाटा पिकावर ब्लाईट म्हणजेच जळजळीचा रोग होतो.

या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर आठवडाभरात संपूर्ण पीक खराब होऊ शकते. मात्र हा रोग सहजासहजी ओळखता येणे शक्य नसते यामुळे याचे लक्षण तपासण्यासाठी तज्ज्ञांना शेतात जावे लागते.

हा रोग सूक्ष्म तपासणीनंतरचं लक्षात येतो. मात्र आता या नवीन तंत्रज्ञानामुळे पिकावर रोग आहे की नाही हे फक्त पानांच्या एका फोटोवरून कळणार आहे. यामुळे निश्चितचं शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वीच्या संशोधकांनी कॉम्प्युटेशनल मॉडेलवरून कॉम्प्युटर अँप तयार केले होते, मात्र अँपची साईज अर्थात एमबी जास्त असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा योग्य फायदा मिळत नव्हता.

आता आयआयटी टीमने हे अँप सुमारे दहा एमबी इतके लहान केले आहे, जेणेकरून ते स्मार्टफोनवर सहज हाताळता येऊ शकते आणि स्मार्टफोनवर उपलब्ध होईल.

हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने या अँप्लिकेशनच्या चाचणीसाठी नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे आगामी काही दिवसात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हे अँप सहज उपलब्ध होणार आहे.

हे मॉडेल देशभर कार्यान्वित करण्यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले जातं आहे. भारतात सुमारे 2.4 लाख हेक्टर जमिनीवर बटाट्याची लागवड केली जाते.

वार्षिक उत्पादन सुमारे 24.4 लाख टन आहे. मात्र ब्लाईट रोगाचा 20 ते 30 टक्के उत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

यामुळे या नव्याने विकसित होणाऱ्या ॲप्लिकेशनचा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हे काम सीपीआरआय शिमला यांच्या सहकार्याने डॉ. श्रीकांत श्रीनिवासन, सहयोगी प्राध्यापक, स्कूल ऑफ कॉम्प्युटिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आयआयटी मंडी यांच्या देखरेखीखाली केले गेले आहे.

या संशोधनात पानांचे रोगग्रस्त भाग शोधण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला यश आले आहे. त्याचे 95% निकाल सकारात्मक आले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts