Maharashtra News:सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी महत्वाचा निर्णय दिला आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बाठिया आयोगाच्या अहवालानुसारच दोन आठवड्यात निवडणुका घ्या, असा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.
त्यामुळे राज्यात ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळाले आहे.आजच्या सुनावणीच्यावेळी लवकरात लवकर निवडणुका घ्या, असे न्यायाधीशांनी सांगितले. दोन वर्षापासून निवडणुका रखडल्या आहेत.
वेळेवर निवडणुका झाल्या पाहिजे, न्यायालयाची दिशाभूल करु नका, असे न्यायालयानं म्हटलं आहे.निवडणूक आयोगाने सांगितले की, कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकांची तयारी सुरू.
पावसाळ्यामुळे आम्ही निवडणूक थांबवली होती. आम्ही आमची तयारी पूर्ण केली आहे, फक्त निवडणूक घ्यायची आहे. २ आठवड्यांत आम्ही निवडणुका घेऊ शकतो, अशी माहितीही आयोगाने कोर्टाला दिली.या सगळ्या बाबींची पूर्तता करुन अहवाल सादर करा, बाठिया आयोगानुसार पुढच्या निवडणुका घ्या, असा आदेश कोर्टानं आयोगाला दिला आहे.