मुंबई : ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य शासनाला आणखी एक दणका दिला आहे. व आता दोन आठवड्यात पुन्हा निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.तसेच निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून विरोधकांनी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल सुरु केला आहे. नुकतेच भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, असं भाष्य मी यापूर्वीच केलं होतं. आता ते सत्यात उतरताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आणि या मागची भूमिका महत्वाची आहे.
सर्वोच्च न्यायालयात गंभीरपणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले, असे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासमोरचं प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेलं आहे,” असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
तसेच पुढे म्हणाल्या की, “सर्वोच्च न्यायालायने निवडणुका जाहीर करण्यास सांगितले आहे. राज्य सरकार आता काय भूमिका घेणार आहे? या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का?
राज्य सरकार मंत्रीमंडळात एक विशेष निर्णय घेऊन, आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार आहे का? याकडे आता आमचं लक्ष आहे,” असेही अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.