ताज्या बातम्या

अरे बापरे! या भाजीला मिळतोय इतका भाव : मेथी@३५

Ahmednagar News :सध्या महागाईच्या वणव्यात प्रत्येकजण होरपळून निघत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून, कांदा विक्री न करता तो साठवण्याला प्राधान्य देत आहे.

तर इंधनापाठोपाठ बाजारात वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. उन्हाच्या तडख्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आवक घटली असून परिणामी भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत.

यात सर्वाधित म्हणजे किरकोळ विक्रीत मेथीच्या एका जुडीला तब्बल ३० ते ३५ रूपये मोजावे लागत आहेत. त्यापाठोपाठ कोथिंबीर, दोडका, कारले, बटाटे, हिरवी मिरची, शिमला मिरची, घेवडयाने देखील चांगलाच भाव खाल्ला आहे.

इंधनासह जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. यात सर्वात जास्त भरडला जात आहे तो म्हणजे शेतकरी एकीकडे झालेल्या दरवाढीमुळे शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे उत्पन्न मात्र त्याच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजे मिळत आहे.

त्यामुळे शेती नकोरे बाबा अशी मनस्थितीत तो आहे. कांद्यासाठी प्रचंड खर्च करून उत्पन्न घेतले. अन् कांदा विक्रीसाठी आनला असता कांदा विक्रीतून त्याला झालेला खर्च देखील पदरात पडत नसल्याचे विदारक चित्र आहे. यात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे किरकोळ विक्रेते मात्र मालामाल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts