अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Farming business :- सध्या शेती व्यवसायात (Farming business) नवयुवक दोन गटात विभागले गेले आहेत. एक गट शेतीला तोट्याचा सौदा म्हणतो आणि शेती करण्यापासून दुरावत चालला आहे.
तर दुसरा गट शेती ही नियोजनबद्ध पद्धतीने केली आणि शेतीमध्ये काळाच्या ओघात आमूलाग्र बदल केले तर यातून लाखो रुपये कमवले जाऊ शकतात.
या दुसर्या गटात आता अनेक सुशिक्षित नवयुवक देखील येत आहेत. यामुळे भारतीय शेती लवकरच हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेश मधील एक युवती देखील लंडन मधून शिक्षण घेऊन आपल्या गावी शेती करू लागली आहे.
विशेष म्हणजे या युवतीने मातीविना शेती करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. आज आपण याच युवतीच्या यशाविषयी (Farmer Success Story) जाणून घेणार आहोत.
पूर्वीने लंडनमध्ये (London) राहुन एमबीएचे (MBA) शिक्षण पूर्ण केले. मात्र, असे असताना देखील तिने आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि शेती करू लागली.
पूर्वी ने हायड्रोपोनिक पद्धतीने (hydroponic method) भाजीपाला लागवड करून चांगला मोठा नफा कमावला आहे. तिने उत्पादित केलेल्या हायड्रोपोनिक पद्धतीच्या (Hydroponic Farming) भाजीपाल्यास मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
हायड्रोपोनिक पद्धतीने उत्पादीत केलेला भाजीपाला आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो यामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे या भाजीपाल्याची मोठी मागणी असते.
यूपीमधील कानपूर जिल्ह्यातील इटावा शहरापासून आठ किलोमीटर दूर असलेल्या मौजे फुफई मध्ये लंडन रिटर्न पूर्वीने हायड्रोपोनिक पद्धतीचा अवलंब करीत भाजीपाल्याची शेती (Vegetable farming) केली. पूर्वी सांगते की, या शेतीसाठी साधारण शेतीपेक्षा कमी पाण्याची गरज असते.
सामान्य शेतीचे दहा टक्के पाणी या पद्धतीने उत्पादित केलेल्या भाजीपाल्यास पुरेसे असल्याचा दावा पूर्वीने केला आहे. यामध्ये मातीची आवश्यकता नसल्याने ही शेती कुठेही करता येणे शक्य आहे. या शेतीसाठी सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असते.
या टेक्निकचा वापर करत पूर्वी ओक लेट्युस, ब्रोकोली, चहा, चेरीटोमॅटो, भोपळी मिरची आणि तुळस या पिकाची लागवड करते. या भाज्यांना हॉटेल्स मध्ये सर्वाधिक मागणी असते.
लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेतले मग हायड्रोपोनिक फार्मिंगचा विचार मनात आला तरी कसा आणि का? असा प्रश्न जागरणने पूर्वीस विचारला असता या प्रश्नावर, पुर्वी सांगते की, कोरोनाच्या काळात तिला आपल्या सदृढ आरोग्यासाठी पोषक घटकांचे महत्व समजले आणि तिने हायड्रोपोनिक शेतीवर काम करण्याचा निर्णय घेतला.
एक महिला शेतकरी या नात्याने जिल्ह्यातील रहिवाशांना घरबसल्या परवडणाऱ्या किमतीत सकस फळे आणि भाजीपाला उपलब्ध करून देणे हे तिचे ध्येय असल्याचे तिने सांगितले.
या टेक्निकचा उपयोग करून चांगले उत्पादन घेऊन भाजीपाला विकून चांगले उत्पन्न मिळू शकते, असे देखील पूर्वीने नमूद केले.