ताज्या बातम्या

OLA New EV : ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक कारची झलक बघून व्हाल थक्क, किंमत आणि रेंज किती असेल? जाणून घ्या

OLA New EV : OLA ही इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. अशातच ओलाने (OLA) नुकतीच आपली नवीन स्कूटर (OLA New Electric Scooter) लाँच केली आहे.

त्याचबरोबर एक नवीन सॉफ्टवेअर अपडेटही OLA ने दिले आहे. ओलाने आपल्या कारचा नवीन टीझर सोशल मीडियावर (Social media) जारी केला आहे. यामध्ये ओलाने नवीन कारचा लूक आणि फीचर्स कसे असेल हे दाखवले आहे.

गाडी कशी आहे

ओलाच्या नव्या कारची (OLA New Electric Car) झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्याचे रूप या छोट्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. यात कारच्या बोनेटवर एलईडी लाईट्सची पट्टी आहे. कारमध्ये ड्युअल एलईडी हेडलॅम्प सेट देण्यात आला आहे.

यासोबतच कारमध्ये डॅशबोर्डची झलकही दाखवण्यात आली आहे. कारला राउंड ऐवजी स्क्वेअर स्टिअरिंग देण्यात आले आहे. या स्टिअरिंगशिवाय गाडीची कंट्रोलिंग बटणे हाताजवळ ठेवण्यात आली आहेत. ज्यामुळे गाडी चालवताना कार नियंत्रित करणाऱ्या बटनांचा वापर करणे सोपे होते.

रेंज काय असेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारमध्ये बॅटरीची क्षमता अधिक ठेवली जाऊ शकते. कारमध्ये दिलेली बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, कार 500 किमी पर्यंत चालवता येते. यासोबतच कारमध्ये बसवण्यात आलेली मोटारही खूप पॉवरफुल असेल. शक्तिशाली मोटर आणि चांगल्या क्षमतेच्या बॅटरीमुळे ही कार केवळ चार सेकंदात शून्यावरून 100 किमीचा वेग गाठू शकेल.

किंमत काय असेल

काही काळापूर्वी कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी नवीन इलेक्ट्रिक कारच्या किमतींची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, कार लॉन्च करताना त्याची किंमत 40 ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts