राज्यात दीड हजार शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित होणार

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  राज्यातील शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यानुसार राज्यातील १५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले होते.

त्यानूसार शालेय शिक्षण विभागाने राज्यात पहिल्या टप्प्यात ४८८ प्राथमिक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्यास मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील १६ समावेश आहे.

या शाळांचा समावेश :- कळस बु आणि वीरगाव (अकोले), उक्कडगाव (श्रीरामपूर), हंगेवाडी (श्रीगोंदा), बालमटाकळी (शेवगाव), कोंढवड बु (राहुरी), पिंपरीलौकी अजामपूर (संगमनेर),

गोल्हारवाडी (राहाता), मिडसांगवी (पाथर्डी), हंगा (पारनेर), खुपटी (नेवासा), रेणुका नगर (नगर मनपा हद्द), धोत्रे ( कोपरगाव), रेहकुरी (कर्जत), देवदैठणे (जामखेड) आणि भोरवाडी (नगर) यांचा समावेश आहे.

या योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश :-

शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे, खेळाचे साहित्य, ग्रंथालय- वाचनालय, संगणक कक्ष, शाळेत विद्यूतीकरण सुविधाा, विद्यार्थ्यानूसार वर्ग खोल्या,

मुलां-मुलींसाठी स्वतंत्र पुरेशी अस्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाक गृह व भांडार कक्ष, शैक्षणिक साहित्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेत सुविधा,यासंह इतर गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts