Ahmednagar : चालकाच्या चुकीमुळे नेवासा बुद्रुक शिवारातील पवार वस्तीजवळ फळबाग तोडणे करिता मजूर घेऊन जाणारा टेंपो (tempo) उलट्यालने एकाचा जागीच मुत्यू (died on the spot) झाला असून इतर आठ जण जखमी झाले आहे.
सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात नेवासा पोलीस ठाण्यात मिरजा अजाझ बेग इकबाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमीन युसूफ पठाण असं गुन्हा दाखल झालेल्या टेंपो चालकाचे नाव आहे.
दिं 24 जून रोजी सकाळी 6 च्या सुमारास फिर्यादी मिरजा अजाझ बेग यांच्यासह आमीन युसूफ पठाण, मिर्झा खलील छोटु बेग मिर्झा शाकीर बेग, युनूस बेग, मिर्झा जहीर बेग छोटु बेग, इम्रान शेख, मिर्झा फाईझ फरिद बेग, मिर्झा फरदीन बेग (सर्व रा. खुलताबाद जि. औरंगाबाद) आणि सोयल सलीम शेख, मुक्तार शेख अहमद शेख, शेख इब्राहीम शेख (सर्व रा. दौलताबाद ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) मिर्झा इलीयास इकबाल यांचे मालकीची असलेली टाटा कंपनीचा 407 टेम्पोमध्ये बसून खुलताबाद जि. औरंगाबाद येथून पुनतगाव येथील नेवासा बुद्रुक शिवारातील फळबाग तोडणेकरीता नेवासा बुद्रुक ते पुनतगाव रोडने जात असताना चालक आमीन युसूफ पठाण हा भरधाव वेगात टेम्पो चालवित होता.
सकाळी आठच्या सुमारास नेवासा बुद्रुक शिवारातील शंकर पवार वस्तीसमोरील रस्त्यावर चिखल असल्याने गाडी स्लीप झाल्याने चालक आमीन पठाण यांचे हातून टेम्पोचा तोल जाऊन गाडी अचानक उजव्या बाजूने उलटल्याने गाडीचा अपघात झाला.
या अपघातामध्ये क्लिनर साईटने बसलेला मिर्झा खलील छोटु बेग हा गाडीचे खाली दबला गेल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला तर वरील आठ जण जखमी झाले.
टेम्पो चालकाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 04(अ, 337, 338, 427 तसेच मोटार वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शनावाखाली पोलीस नाईक तमनर पुढील तपास करत आहेत.