चुलत्याचा अंत्यविधी मला न कळवता का केला म्हणत एकाने डोक्यात दगड घालून चुलतभावाचा केला खून; कर्जत तालुक्यातील घटना

सध्या राज्यामध्ये आत्महत्या तसेच हत्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीकधी काही घटनांमध्ये अगदी शुल्लक कारणांवरून खून करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेलेली आहे. अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक शिवारामध्ये रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी रात्री घडला.

या ठिकाणी चुलत्याच्या अंत्यविधीला का बोलावले नाही या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून एकाने डोक्यात दगड घालून चुलत भावाचा खून केल्याची घटना घडली. विकास दिलीप चिंधे असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी आता कर्जत पोलिसांनी यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे/चिंधे  याला अटक केलेली आहे.

 चुलतभावाचा डोक्यात दगड घालून खून

चुलत्याच्या अंत्यविधीला का बोलवले नाही, या कारणावरून झालेल्या भांडणातून डोक्यात दगड घालून एकाने आपल्या चुलतभावाचा खून केला. राक्षसवाडी बुद्रुक शिवारात रविवारी (ता.२२) रात्री ही घटना घडली. विकास दिलीप चिंधे (वय ३०, रा. राक्षसवाडी बुद्रुक) असे मृत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे / चिंधे यास अटक केली आहे. मृत विकास शिंदे हा लातूर येथे खून करून फरार झालेला आरोपी होता. मिळालेल्या माहितीनुसार, राक्षसवाडी बुद्रुक येथे रविवार (२२ सप्टेंबर) रात्री दहा वाजता विकास दिलीप चिंधे व यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे हे दोघे सख्खे चुलतभाऊ प्रथम दारू पिले. दारू पिल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला.

विकास याचे वडील दिलीप सयाजी चिंधे यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले, त्यावेळी मला न कळवता तुम्ही – त्यांचा अंत्यविधी का केला, या कारणावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.दारूच्या नशेत दोघांनी एकमेकाला चांगलाच चोप  दिला.

या वादानंतर दोघेही  तेथेच झोपले, मात्र आपल्याला विनाकारण मारहाण झाली, याचा राग आल्याने आरोपी यशवंतने झोपलेल्या विकास चिंधे याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यास ठार मारले. मृत विकासविरुद्ध लातूर येथे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला छत्रपती संभाजीनगरमधील जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

कोरोना काळात तो पॅरोलवर वे बाहेर आला होता. राक्षसवाडी , बुद्रुक येथे तो राहत होता. ही परत जेलमध्ये न गेल्याने त्यास फरार घोषित होता. आज तो पोलिसांना मिळाला, पण त्याचा खून झाला होता.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी यशवंत उर्फ ही पप्पू शांतीलाल शिंदे (हल्ली रा. बेलवंडी, ता. कर्जत) यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत दत्तात्रय बाळू थोरात (रा. राक्षसवाडी बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी त खुनाचा गुन्हा दाखल केला.