अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्हयातील पर्यावरण संवर्धनासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून येत्या वटपौर्णिमेपासून (दिनांक २४ जून) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभागाबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.
नगर परिषद, नगरपंचायत हद्दीत लोकसहभागातून सहा लाख ७० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या रोप लागवडीने या अभियानाची सुरुवात होईल.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भात जिल्हयातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
कोरोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखीत झाले. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी देशात अनेक रूग्णांची दुर्देवाने जिवीतहानी झाली. हवेतील प्राणवायूची पर्याप्त मात्रेत वृद्धी व संतुलन राखणे कामी वृक्षसंवर्धन महत्वाचेच आहे.
शहरी भागात वाढते वायू प्रदूषण लक्षात घेतमाहे जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हयातील नगर परिषद, पंचायत क्षेत्रात प्रशासकिय यंत्रणा व लोकसहभागातून ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविण्यात येणार आहे.