OnePlus 11 5G : OnePlus सतत आपले शानदार 5G स्मार्टफोन लाँच करत असते. खास करून तरुणाईला कंपनीचे स्मार्टफोन खूप आवडतात. जर तुम्ही कंपनीचा 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही OnePlus 11 5G फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता.
तुम्हाला OnePlus चा हा शानदार स्मार्टफोन 54,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे या फोनवर तुम्हाला एकूण 6,000 रुपयांची सवलत मिळेल, जी एक्सचेंज बोनस म्हणून देण्यात येईल. हे लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल आणि स्थिती, उपलब्धता यावर अवलंबून असणार आहे.
इतकेच नाही आता तुम्ही अॅक्सिस बँक किंवा सिटी कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 2,000 रुपयांची झटपट सवलत मिळू शकते. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Adreno 740 GPU आणि 16GB पर्यंत LPDDR5X RAM सह शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर पाहायला मिळेल.
OnePlus 11 5G च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच क्वाड-एचडी 10-बिट LTPO 3.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1,440×3,216 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. हा Android 13 वर आधारित कंपनीच्या OxygenOS 13 इंटरफेसवर काम करतो.
OnePlus फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि मागील बाजूस 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी फोनच्या पुढच्या बाजूला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच यात पॉवरसाठी 5,000mAh बॅटरी दिली आहे आणि 100W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. इतकेच नाही तर OnePlus च्या या फोनमध्ये कंपनीचे HyperBoost गेमिंग इंजिन दिले आहे. यामध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळेल.