OnePlus 5G : जर तुमच्यासमोर वनप्लस या स्मार्टफोनचे नाव जरी घेतले तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर या फोनचे जबरदस्त फीचर्स आणि कॅमेरा येतो. या कंपनीने अल्पावधीतच खूप ग्राहकवर्ग मिळवला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी OnePlus 10 Pro 5G हा फोन लाँच केला होता.
या फोनची मूळ किंमत 66,999 रुपये इतकी आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून तो तुम्ही खुप स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीचा हा 5G फोन 17,000 रुपयांच्या सवलतीत हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जो फक्त 42 मिनिटांत फुल चार्ज होतो.
किंमत झाली 50 हजारांनी कमी
या सवलतीनंतर OnePlus फोनची किंमत फक्त 49,999 रुपये होत आहे. तुम्हाला निवडक बँक कार्ड्ससह व्यवहारांवर अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. इतकेच नाही तर, Flipkart Axis Bank कार्ड्ससह व्यवहारांवर 5% कॅशबॅक उपलब्ध आहे. हा फोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज असणार आहे.
मिळत आहे उत्तम प्रोसेसर
या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus च्या या फोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. या फोनचा डिस्प्ले 3216X1440 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. तर Android 12 वर आधारित या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Qualcomm Snapdragon 8Gen चिपसेट दिला जात आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.
मजबूत बॅटरी
वनप्लसच्या या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 8MP टेलिफोटो लेन्स दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जात आहे, जी 80W सुपर VOOC फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीकडून या फोनमध्ये टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.