OnePlus 9 5G : वनप्लसच्या ‘या’ 5G फोनवर बंपर सवलत! 12 हजारांचा होणार फायदा, जाणून घ्या ऑफर

OnePlus 9 5G : भारतीय बाजारात वनप्लसच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 5G फोन घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने OnePlus 9 5G हा फोन आणला होता. आता यावर ऑफर मिळत आहे.

कंपनीच्याच वेबसाइटवर ही ऑफर उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 54,999 रुपये इतकी आहे. परंतु कंपनीच्या स्पेशल ऑफरमध्ये 21% डिस्काउंटनंतर तो तुम्हाला 42,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच तुम्हाला 6 महिन्यांसाठी Spotify Premium चे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

OnePlus 9 5G फोन एकूण तीन रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता- एस्ट्रल ब्लॅक, विंटर मिस्ट आणि आर्क्टिक स्काय. परंतु सध्या फोनचा केवळ एस्ट्रल ब्लॅक कलर व्हेरिएंट कंपनीच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असून OnePlus च्या या फोनमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅमेरा सेटअप आणि प्रोसेसरसह अनेक उत्कृष्ट फीचर्स पाहायला मिळतील.

जाणून घ्या OnePlus 9 5G ची फीचर आणि स्पेसिफिकेशन

त्याशिवाय कंपनी या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55 इंच फ्लुइड AMOLED डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह तुम्हाला खरेदी करता येईल. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येईल. तसेच प्रोसेसर म्हणून, कंपनी Adreno 660 GPU सह Snapdragon 888 चिपसेट देत आहे.

तसेच वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले असून यात 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सोबत 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी, तुम्हाला निश्चित ऑटोफोकस वैशिष्ट्यासह 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील पाहायला मिळेल.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या OnePlus 9 5G या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली असून ती 65T फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याच्या OS बद्दल सांगायचे झाले तर, फोन Android 11 वरील सर्वोत्तम Oxygen OS वर काम करेल.

तर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये तुम्हाला NFC, Bluetooth 5.2, Wi-Fi, USB Type-C पोर्ट आणि GPS सारखे पर्याय पाहायला मिळेल. इतकेच नाही तर कंपनी शक्तिशाली आवाजासाठी फोनमध्ये डॉल्बी एटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts