ताज्या बातम्या

OnePlus Foldable Phone : अखेर ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार सॅमसंग,ओप्पोला टक्कर देणारा वनप्लसचा फोल्डेबल फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Foldable Phone : सध्या भारतीय टेक बाजारात सॅमसंग, ओप्पो आणि मोटोरोला यांसारख्या दिग्ग्ज स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांचे फोल्डेबल फोन धुमाकूळ घालत आहेत. या फोनची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

अशातच आता या कंपन्यांना OnePlus टक्कर देणार आहे. कारण लवकरच भारतीय बाजारात फोल्डेबल फोन लाँच होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोल्डेबल फोन असणार आहे. इतकेच नाही तर कंपनी आपला आगामी फोन OnePlus Nord N30 लाँच करण्याच्या तयारीत आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीच्या आगामी फोनचे म्हणजे OnePlus V Fold आणि OnePlus V Flip चे ट्रेडमार्क समोर आले होते. आगामी फोनमध्ये Samsung Galaxy Z Fold 4 प्रमाणे 2K रिझोल्यूशनसह डिस्प्ले असेल.

तसेच कंपनी आपला नवीन फोन OnePlus Nord N30 वर काम करत असून जो OnePlus Nord N20 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असणार आहे. रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की फोन कोणत्याही अंतराशिवाय पूर्णपणे फोल्ड करतो. तसेच, अंतर्गत डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर लेआउट या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. त्यात खूप जाड बेझल्स दिसत आहेत.

कंपनीचा हा पहिला फोल्डेबल फोन असणार आहे. जो सॅमसंग, ओप्पो आणि मोटोरोला सारख्या कंपन्यांच्या फोल्डेबल फोनला टक्कर देईल. हा फोल्डेबल फोन ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार हा फोन Tensor G2 प्रोसेसर सह लाँच होईल. हा प्रोसेसर Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्ये देखील दिसतो. तसेच यात 7-6 इंचाचा इनर डिस्प्ले दिला जाईल.

यात Android 13 सारखी होमस्क्रीन दिसत असून Googleने त्याच्या पहिल्या फोल्डेबल फोनवर कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान कंपनीचा आगामी फोन OnePlus Nord N30 हा OnePlus Nord CE 3 Lite 5G ची री-ब्रँडेड आवृत्ती असणार आहे. यया नवीन फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्लेसह 8GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर दिला जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts