OnePlus : OnePlus 10 Pro 5G च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. वनप्लसचा हा फ्लॅगशिप (flagship) स्मार्टफोन आता स्वस्तात उपलब्ध होणार आहे.
हा फोन 66,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. फोन दोन स्टोरेज वेरिएंट्समध्ये येतो – 8GB RAM + 128GB आणि 12GB RAM + 256GB. OnePlus 10T लॉन्च झाल्यापासून फोनच्या किंमतीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हा या वर्षी लॉन्च होणारा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर सह सादर करण्यात आला होता.
OnePlus 10 Pro 5G ची नवीन किंमत
वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या स्मार्टफोनच्या किंमतीत 5,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कंपनीने या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या दोन्ही स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत ही कपात केली आहे.
किमतीत कपात केल्यानंतर, OnePlus 10 Pro चे बेस 8GB RAM + 128GB मॉडेल 61,999 रुपयांना उपलब्ध होईल. त्याच वेळी, त्याचे 12GB RAM + 256GB मॉडेल 71,999 रुपयांऐवजी 66,999 रुपयांना उपलब्ध होईल. OnePlus ने अधिकृत वेबसाइट तसेच ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर फोनची नवीन किंमत अपडेट केली आहे.
OnePlus 10 Pro ची फीचर्स
OnePlus 10 Pro 5G मध्ये 6.7-इंचाचा Fluid AMOLED LTPO डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचे डिस्प्ले रिझोल्यूशन 3216 x 1440 पिक्सेल आहे. OnePlus च्या या फ्लॅगशिप फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. OnePlus च्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे.
हा फोन 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. OnePlus 10 Pro 5G च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 48MP चा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, फोनमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 8MP टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे.