Oneplus 11 : भारतीय बाजारात दिग्ग्ज टेक कंपनी सतत आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आज कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Oneplus 11 लाँच करणार आहे. लाँच झाल्यानंतर हा स्मार्टफोन iQoo 11 शी स्पर्धा करणार आहे.
कंपनी फक्त OnePlus 11 5G हा स्मार्टफोन नाही तर, कंपनी त्यासोबत OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Pad आणि OnePlus TV 65 Q2 Pro सादर करणार आहे. इतर स्मार्टफोन्सप्रमाणे कंपनीचे हे फोनदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.
OnePlus 11 5G मध्ये मिळणार ही फीचर्स
कंपनी हा फोन 6.7-इंचाच्या 2K रिझोल्यूशन डिस्प्लेसह सादर करणार असून ज्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल आणि डिस्प्लेचे पॅनेल AMOLED LTPO 3.0 असेल. फोनला स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 सह ColorOS 13 मिळणार आहे.
तसेच कंपनी या फोनसोबत चार वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स देणार आहे असा दावा केला जात आहे. म्हणजेच, Android 16 आणि Android 17 फोनसोबत उपलब्ध असणार आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये 16 GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 512 GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज मिळू शकते. फोनमध्ये वॉटर रेसिस्टंटसाठी IP68 रेटिंग उपलब्ध असणार आहे.
जाणून घ्या कॅमेरा आणि बॅटरी
कंपनीचा हा आगामी फोन हॅसलब्लॅड ब्रँडिंगसह तीन रियर कॅमेऱ्यांसह सादर केला जाणार आहे. यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल Sony IMX890 सेन्सर, सेकंडरी लेन्स 32 मेगापिक्सेल Sony IMX709 टेलिफोटो पोर्ट्रेट लेन्स आणि तिसरी लेन्स 48 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल Sony IMX581 सेन्सरसह येणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला जात असून हा फोन भारतात 5,000mAh बॅटरी आणि 100W चार्जिंगसह सादर करण्यात येणार आहे.
इतकी असणार संभाव्य किंमत
या कंपनीने फोनची किंमत अजूनही जाहीर केलेली नसून सोशल मीडियावर फोनच्या किंमतीबाबत अनेक दावे केले जात आहेत. या दाव्यानुसार, हा फोन 60 हजार किंवा त्याहून अधिक किमतीत सादर करण्यात येणार आहे. आज फोन लॉन्च केल्यानंतरच याची किंमत समजेल.
iQOO 11 5G
नुकतेच iQOO ने त्याचा सर्वात वेगवान आणि फ्लॅगशिप फोन iQOO 11 5G भारतात लॉन्च केला आहे. हा सर्वात वेगवान फोन आहे असा दावा केला जात आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे.
या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा 2K E6 AMOLED डिस्प्ले आणि 120W जलद चार्जिंगसाठी समर्थन आहे. फोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आणि 16 मेगापिक्सेल सेल्फी शूटर आहे. फोनसोबत 512GB पर्यंत स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे.