OnePlus Nord 3 5G : स्मार्टफोनप्रेमींसाठी गुड न्यूज! 5 हजारांत खरेदी करा OnePlus चा ‘हा’ फोन, जाणून घ्या फीचर्स

OnePlus Nord 3 5G : जर तुम्हाला वनप्लसचा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमधून OnePlus Nord 3 5G हा फोन अवघ्या पाच हजारात खरेदी करू शकता.

या फोनची मूळ किंमत 43,872 रुपये आहे. तुम्ही हा फोन 37,998 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर 33,050 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. जुन्या फोनच्या बदल्यात पूर्ण रक्कम मिळाल्यावर, तुम्हाला हा फोन 37998 – 33050 म्हणजेच 4948 रुपयांत खरेदी करता येईल.

हे लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे. तसेच कंपनी या फोनवर 2,000 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत ​​आहे. बँक ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत आणखी 2250 रुपयांनी कमी करता येईल. तुम्हाला हा फोन आकर्षक नो-कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल. जाणून घ्या या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

जाणून घ्या OnePlus Nord 3 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 3 5G या फोनमध्ये तुम्हाला 2772×1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये तुम्हाला 16 GB LPDDR5x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळेल. यात प्रोसेसर म्हणून डायमेंशन 9000 चिपसेट दिला आहे.

तर फोटोग्राफीसाठी, OnePlus Nord 3 च्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फोनचा मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरने सुसज्ज आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांना सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध करून देत आहे. या फोनची बॅटरी 5000mAh असून ती 80 वॅट सुपरव्हूक चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो

Ahmednagarlive24 Office

Recent Posts