OnePlus Smartphone Discounts : OnePlus 10R 5G स्मार्टफोन खरेदीवर करा 10,000 बंपर बचत, त्वरित मिळवा असा फायदा

OnePlus Smartphone Discounts : वनप्लस ही एक देशातील नामांकित स्मार्टफोन कंपनीपैकी एक आहे. OnePlus चे स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. दिवसेंदिवस या स्मार्टफोनची लोकप्रियता वाढत चालली आहे.

OnePlus चा शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी फोन खरेदीवर बचतीची उत्तम संधी आहे. कारण OnePlus कडून त्यांच्या 10R मॉडेलवर 10,000 हजारांची बंपर सूट दिली जात आहे.

OnePlus 10R 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटवर ही सूट देण्यात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली बॅटरी पॅक देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग बॅटरी पर्याय देण्यात आला आहे.

ई-कॉमर्स साइट्सवर OnePlus 10R 5G स्मार्टफोन खरेदीवर ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक OnePlus 10R 5G स्मार्टफोन खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकतात.

OnePlus 10R वर बंपर ऑफर

OnePlus 10R या स्मार्टफोनची लॉन्च वेळी 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 38,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र आता Amazon कडून या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.

ई-कॉमर्स वेबसाईट Amazon कडून OnePlus 10R स्मार्टफोनवर 10,000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे OnePlus 10R स्मार्टफोनची Amazon वर फक्त 28,999 रुपये किंमत आहे. Amazon कडून ही ऑफर फक्त सिएरा ब्लॅक कलर व्हेरियंटवर दिली जात आहे.

Amazon ई-कॉमर्स वेबसाईटवरून तुम्ही OnePlus 10R स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्ही Amex क्रेडिट कार्ड EMI पर्याय वापरला तर तुम्हाला 1750 रुपयांची देखील सूट देण्यात येत आहे.

OnePlus 10R 5G वैशिष्ट्ये

OnePlus कडून त्यांच्या 10R 5G स्मार्टफोनमध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी पर्याय दिला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेल लेन्स देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts