OnePlus Nord CE 2 Lite 5G : काही दिवसांपूर्वी OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला होता. आपल्या सर्व स्मार्टफोनप्रमाणे या स्मार्टफोनमध्येदेखील कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली आहे. आता या स्मार्टफोनवर Amazon एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहे.
कंपनीचा हा मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणारा 5G स्मार्टफोन आहे. तो तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की ही सवलत फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे स्वस्तात चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका.
किंमत
हे लक्षात घ्या की हा OnePlusचा 6 GB रॅम असणारा स्मार्टफोन 19,999 रुपयांना सादर केला होता, परंतु तो आता 1000 रुपयांच्या सवलतीसह Amazon India वेबसाइटवर 18,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध केला आहे. ग्राहक हा फोन ब्लॅक डस्क आणि ब्लू टाइड या दोन कलरमध्ये खरेदी करू शकतात. परंतु, जर तुम्हाला किंमत जास्त पाहायला मिळाली तर निराश होऊ नाही. कारण तुम्ही एक्सचेंज बोनस अंतर्गत खूप स्वस्तात फोन खरेदी करू शकता.
मिळत आहे एक्सचेंज ऑफर
तुम्हाला फोनवर 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, फोनवर 12,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असून ती तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल तरच तुम्हाला जास्त सवलत मिळवू शकाल.
EMI ऑफर उपलब्ध
तुम्ही एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरण्यास सक्षम नसला तर, तुम्ही प्रत्येक महिन्याला 908 रुपयांच्या EMI ऑफर अंतर्गत देखील फोन विकत घेऊ शकता. तुम्ही आता Amex क्रेडिट कार्ड वापरून 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
Nord CE 2 Lite 5G मध्ये 64MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह तिहेरी-कॅमेरा सेटअप कंपनीने दिलेला आहे. इतकेच नाही तर, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळत आहे. सेल्फी प्रेमींसाठी 16MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
पॉवर बॅकअपसाठी कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी 5000 mAh बॅटरी दिली आहे. फोनचे वजन सुमारे 195 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 8.5 मिमी आहे. या फोनमध्ये 120Hz IPS LCD आहे. Qualcomm Snapdragon 695 SoC चिप Nord CE 2 Lite 5G मध्ये प्रोसेसर वापरण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा 8GB पर्यंत रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. तसेच 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात येत आहे.