ताज्या बातम्या

OnePlus Smartphone Offer : सुवर्णसंधी! 20 हजार रुपायांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार OnePlus 11R 5G, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

OnePlus Smartphone Offer : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस सतत आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. परंतु कंपनीच्या स्मार्टफोनच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाही. अशातच तुमच्याकडे आता स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे.

तुम्ही आता कमी किमतीत OnePlus 11R 5G हा फोन खरेदी करू शकता. कंपनीने हा फोन काही दिवसापूर्वी लाँच केला होता. आता त्यावर 20 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. अशी संधी तुम्हाला कुठे आणि कशी मिळत आहे जाणून घ्या.

जर तुम्ही Amazon वर OnePlus 11R खरेदी करत असाल तर तुम्हाला अनेक ऑफर आणि सवलत मिळू शकते. जरी कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काउंट देत नसली तरी निवडक बँक कार्ड्सने पेमेंट केले तर तुम्हाला बँक ऑफरचा लाभ घेता येईल. विनाशुल्क EMI वर नवीन फोन खरेदी करण्याची संधी आता तुमच्याकडे आहे. तुम्ही आता तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण केली तर तुम्हाला आणखी मोठ्या सूटचा लाभ मिळेल.

बंपर सवलतीत खरेदी करता येणार फोन

भारतीय बाजारपेठेत 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह OnePlus 11R 5G ची किंमत 44,999 रुपये इतकी आहे. तुम्ही आता इंडसइंड क्रेडिट कार्डद्वारे EMI व्यवहाराच्या मदतीने किंवा HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्डच्या मदतीने हा फोन खरेदी करत असाल तर तुम्हाला 7.5% किंवा जास्तीत जास्त 1,500 रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल. हे निवडक क्रेडिट कार्ड आणि Amazon Pay Later सह विना-खर्च EMI वर खरेदी करता येईल.

जर तुम्ही OnePlus 11R 5G खरेदी करताना त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला एकूण 19,700 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा या सवलतीचे मूल्य जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असणार आहे. हा फोन तुम्हाला गॅलेक्टिक सिल्व्हर आणि सोनिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आणखी स्वस्तात खरेदी करता येईल.

जाणून घ्या फीचर्स…

कंपनीने आपल्या प्रीमियम फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.74-इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह 256GB पर्यंत UFS3.1 स्टोरेज दिले आहे. यामध्ये Android 13 वर आधारित OxygenOS 13 सॉफ्टवेअर स्किन उपलब्ध आहे.

या फोनच्या मागील पॅनलवरील गोल मॉड्यूलमध्ये OIS समर्थनासह 50MPSony IMX890 प्राथमिक सेन्सर उपलब्ध असणार आहे. तसेच 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि तिसरी मॅक्रो लेन्स उपलब्ध असणार आहे. 16MP सेल्फी कॅमेरा असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts