OnePlus Smartphone Offer : मस्तच! 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा OnePlus चा महागडा 5G फोन, पहा संपूर्ण ऑफर

OnePlus Smartphone Offer : OnePlus चे स्मार्टफोन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. कंपनीही मागणीनुसार वेगवेगळे स्मार्टफोन लाँच करत असते. त्यामुळे त्याच्या किमती जास्त आहेत. कंपनी आता 5G फोन आणत आहेत.

OnePlus 11R 5G हा फोन कंपनीने काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. ज्यावर आता तुम्हाला सर्वात मोठी सवलत मिळत आहे. तुम्ही फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. Amazon वर अशी ऑफर मिळत आहे.

10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा

OnePlus 11R 5G च्या टॉप वेरिएंटवर ऑफर उपलब्ध आहे. जे 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह तुम्हाला खरेदी करता येईल. Amazon या फोनवर एक्सचेंज ऑफर देत असून किमतीचा विचार केला तर Amazon वर या 16GB रॅम वेरिएंटची किंमत 44,999 रुपये इतकी आहे.

परंतु तो तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. खरंतर Amazon 37,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. याचाच असा अर्थ, समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना स्मार्टफोन असल्यास तसेच तुम्ही पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यास व्यवस्थापित असल्यास या फोनची किंमत आणखी 7,499 रुपयांपर्यंत खाली येईल.

परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची किंमत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. या स्मार्टफोनवर काही बँक ऑफर उपलब्ध असून ज्या तुम्ही वेबसाइटवर जाऊन पाहू शकता.

जाणून घ्या OnePlus 11R 5G खासियत

या फोनचे वजन 204 ग्रॅम असून तो 5G सपोर्टसह येतो. या शक्तिशाली फोनमध्ये 6.74 इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट, 360 Hz टच रिस्पॉन्स रेट आणि HDR 10 प्लस सपोर्टसह येत आहे. तसेच हा फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असून तो OxygenOS वर आधारित Android 13 वर काम करतो. रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन 8GB 128GB आणि 16GB 256GB दोन प्रकारांमध्ये येतो.

तसेच फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये तीन मागील कॅमेरे दिले असून ज्यात OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल सोनी IMX890 लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी, या फोनमध्ये EIS सपोर्टसह 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी असून फोन केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगसह दिवसभर चालेल. कंपनीच्या या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts