OnePlus Smartphone Offer : जबरदस्त फीचर्स आणि 100W चार्जिंगसह OnePlus फोन MRP पेक्षा कमी किमतीत न्या घरी, पहा ऑफर

OnePlus Smartphone Offer : भारतीयांना OnePlus च्या स्मार्टफोनची भुरळ पडली आहे. त्यामुळे कंपनीदेखील सतत आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन बाजारात घेऊन येत असते. OnePlus चा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

तुम्ही आता OnePlus 11R 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. या फोनची किंमत 45,999 रुपये इतकी आहे. या फोनवर 1500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळेल, एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 43,699 रुपयांचा वेगळा फायदा मिळेल. जाणून घ्या या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

जाणून घ्या खासियत

OnePlus च्या या फोनमध्ये 2772×1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74 इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दरासह येईल. डिस्प्लेचा टच रिस्पॉन्स रेट 360Hz असून फोन 18 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512 GB पर्यंत UFS 3.1 2@LANE ​​स्टोरेज पर्यायामध्ये खरेदी करता येईल. तुम्हाला प्रोसेसर म्हणून, या फोनमध्ये Adreno 730 सह Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळेल. कंपनीचा हा फोन Android 13 वर आधारित Oxygen OS वर काम करेल.

इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळाले.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यात Wi-Fi 2×2 MIMO, 5G, WiFi 802.11 a/b/g/n/ac/ax, Bluetooth 5.3, NFC आणि GPS सारखे पर्याय मिळतील. याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 वर आधारित OxygenOS वर काम करेल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts