OnePlus Smartphone Offer : त्वरा करा! ‘या’ फोनवर मिळेल जबरदस्त सवलत, पहा संपूर्ण ऑफर

OnePlus Smartphone Offer : भारतीय बाजारात अनेक OnePlus चे स्मार्टफोन लाँच होत असतात. इतर स्मार्टफोनपेक्षा OnePlus चे स्मार्टफोन खूप महाग असतात. अनेकांना महाग असल्याने फोन खरेदी करता येत नाही.

तुम्ही आता कंपनीचा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. OnePlus 10R 5G हा फोन आता तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी जबरदस्त ऑफर तुमच्यासाठी Amazon वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. OnePlus 10R 5G ची किंमत 38,999 रुपये इतकी आहे. परंतु तो 27,999 रुपयांना सेलमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.

मिळेल अतिरिक्त सवलत

या ठिकाणी ग्राहकांना 11,000 रुपयांची सर्वात मोठी सवलत दिली जात आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना निवडक बँक कार्ड्ससह नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळेल. तसेच ग्राहकांना त्यांचा जुना फोन बदलून 26,300 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलतही मिळू शकते.

या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फोन 80W SuperVOOC सुपर फास्ट चार्जिंग सह तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच, या OnePlus 10R 5G फोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळेल. या फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे फोन केवळ 32 मिनिटांत 1 ते 100 टक्के चार्ज होईल.

त्याशिवाय कंपनीच्या ग्राहकांना फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागच्या बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळेल. यात सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट तसेच 2400 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

OnePlus 10R 5G हा फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8100-MAX प्रोसेसरसह येईल आणि तो Android आधारित OxygenOS वर चालेल. या फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts