ताज्या बातम्या

Onion Subsidy : मायबाप गुजरातमध्ये भेटतय तुम्हीही द्या! प्रति क्विंटल शंभर रुपये कांद्याला अनुदान द्या- कांदा उत्पादक संगठना

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra news :- देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती बघायला मिळते.

यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे केवळ आणि केवळ कांदा पिकावर अवलंबून असते. सध्या राज्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Price) मिळतं आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात नाफेड कडून (Nafed) कांद्याच्या खरेदीचा श्रीगणेशा झाला यामुळे कांद्याच्या दरात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

मात्र शेतकर्‍यांच्या (Onion Grower Farmers) आशा आता फोल ठरत असून नाफेड कडून देखील कांदा योग्य दरात खरेदी केला जात नाहीये.

यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना (Onion Growers Association) मोठी आक्रमक झाली आहे. कांद्याला निदान उत्पादन खर्चापेक्षा अधिक बाजार भाव मिळायला पाहिजे.

मात्र गेल्या चार महिन्यांपासून कांद्याची उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे. यामुळे गेल्या चार महिन्यात खरेदी करण्यात आलेला कांद्याला केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदान स्वरूप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लावून धरली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गुजरात राज्यात कांद्याला गुजरात सरकार अनुदान देत आहे. यामुळे गुजरात सरकार करू शकते मग महाराष्ट्र सरकार का नाही असा सवाल उपस्थित करत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली आहे.

सध्या कांद्याला मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्च काढणे देखील शक्य नाही. यामुळे आतापर्यंत जो कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकला गेला आहे त्या कांद्याला मायबाप सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी या संघटनेने केली आहे.

मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, 16 एप्रिल पासून राज्यात नाफेड कांदा खरेदीसाठी रणांगणात उतरले आहे. देशात सर्वाधिक कांद्याची खरेदी महाराष्ट्रात केली जाते.

सध्या शेतकरी बांधव दोन पद्धतीने कांद्याची विक्री करीत आहेत. एक मार्केटमध्ये आणि नाफेडकडे. मात्र नाफेड देखील शेतकऱ्यांकडून अतिशय कवडीमोल दरात कांदा खरेदी करत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी नाफेडकडून तीन हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने कांदा खरेदी केला जावा.

तसेच आतापर्यंत विक्री झालेल्या कांद्याला मायबाप शासनाने प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी केली आहे.

निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची ही मागणी मोठे चर्चेत आली असून यावर सरकार काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहील.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts