अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- सेवाप्रित सोशल फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी क्यूट बेबी कॉन्टेस्ट घेण्यात येत आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थी व पालकांना सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय व उपाध्यक्षा तथा ग्रुप लीडर डॉ. सिमरनकौर वधवा यांनी केले आहे.
अहमदनगर डान्स आयडॉल ही स्पर्धा वयो वर्षे 4 ते 16 मधील मुला-मुलींमध्ये होणार आहे. सोलो, ड्युएट किंवा स्मॉल ग्रुप प्रकारात डान्सचे सादरीकरण करुन व्हिडिओ बनवायचा आहे. तसेच क्यूट बेबी कॉन्टेस्ट मध्ये तीन वर्षाच्या आतील मुला-मुलींचे फोटो पाठवायचे आहेत.
प्रत्येक ग्रुपमधील पहिल्या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व गिफ्ट हॅम्पर बक्षिस स्वरुपात दिले जाणार आहे. दोन्ही स्पर्धेसाठीचे व्हिडिओ आणि फोटो दि.7 सप्टेंबर पर्यंत 9422081761 व 9890160601 या नंबरच्या व्हॉट्सअपवर पाठवायचे सांगण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी दीप्ती सबलोक यांच्या फंक फ्युजन डान्स अॅण्ड फिटनेस स्टुडिओ यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गीता मित्तल, गागनकौर वधवा, हरमीतकौर माखिजा, अलीशा घैसास,
वंदना थापर, तनु थापर, कोमल साहनी, स्नेहा मेहता, जयश्री मेहेत्रे, तनिक्षा कथुरीया, मिनी खत्री, रश्मी खत्री, मीना चांदोरकर, शेरी धुप्पड, विमी मक्कर, रवी नारंग, अंजू कथूरिया परिश्रम घेत आहेत.