IRCTC : रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांना अनेक सुविधा देते. काही वर्षांपूर्वी प्रवाशांना लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागायचे. परंतु, आता तसे राहिले नाही.
प्रवासी आता रांगेत उभे न राहता म्हणजे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करू शकतात. परंतु यालाही काही मर्यादा आहेत. त्याशिवाय तुमचे रेल्वेचे तिकीट बुक होत नाही. आणि या मर्यादा काय आहेत? पाहुयात.
प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करण्यापूर्वी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकणे गरजेचे असते.
अशी करा पडताळणी
स्टेप 1
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्ही IRCTC द्वारे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. पडताळणीसाठी तुम्हाला त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर जावे लागेल.
स्टेप 2
पोर्टलवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला तुमच्या आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागेल. त्याशिवाय तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी येथे द्यावा लागेल.
स्टेप 3
त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर दोन्हीवर वेगळा ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून तुम्हाला पडताळणी करावी लागेल, त्यानंतर तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल. मग तुम्हाला तिकीट बुक करण्यात कसलीच अडचण येणार नाही.