PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. शेतकर्यांना 2,000 रुपयांचा पुढील हप्ता मिळवायचा असेल, तर त्यांना देय तारखेपूर्वी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
हे सर्व शेतकर्यांना (farmer) बंधनकारक आहे. जर शेतकऱ्यांनी असे केले नाही तर ते पीएम किसान योजनेच्या पुढील म्हणजे 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
31 जुलै ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे –
तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) ई-केवायसी करायचं असेल, तर तुमच्याकडे फक्त पाच दिवस शिल्लक आहेत. जर शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना मोठा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आवाहन आहे की, त्यांना पुढील हप्त्याचे पैसे हवे असतील तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या.
पीएम किसान वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे –
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर असेही सांगण्यात आले आहे की, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. वेबसाइटवर (website) लिहिले आहे, “पीएम किसान योजनेसाठी eKYC करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”
याप्रमाणे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा –