असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- काल केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यास शिवसेनेकडून विरोध करण्यात आला,असा विरोध कधीही होता कामा नये.

दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्या समाधीचं दर्शन अनेकजण घेतात.पण राणेंना विरोध करून शिवसेनाच गलिच्छ राजकारण करु शकते अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केलीय.ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

आज नांदेडमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे मुक आंदोलन करत आहे या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं. काल भागवत कराड यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे असतील असं वाटत नाही असं सांगत पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी हा वर्षभर बैलांना जीव लावत असून बैलगाडा शर्यत ही पारंपारीक आहे.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी बाबत राष्ट्रपतींकडे देखील मागणी करण्यात आली आहे.

असं सांगत दानवे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा देत त्यांचं समर्थन केलं.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts