तरच दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळणार…..’या’ शहरात आजपासून ‘तो’ नियम लागू!

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- तुम्हाला जर तुमच्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकायचे असेल तर तुमच्या डोक्यात हेल्मेट असने आता गरजेचे असणार आहे. हेल्मेटचा वापर करा असे वारंवार आवाहन करून देखील अनेक वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने अखेर पोलिसांनी हे धडक पाऊल उचलले आहे.

पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांच्या आदेशानूसार १५ ऑगस्टपासून नाशिकमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपचालकांच्या बैठका घेऊन ‘हेल्मेट असेल तरच दुचाकीचालकांना पेट्रोल द्या’ असे आदेश त्यांना देण्यात आल्याचेही चौघुले यांनी म्हटले आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पेट्रोल पंपचालकांना पोलिसांकडून एक नियमावली आखून देण्यात आली असून, त्यानुसार हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल असे फलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावावेत.

पेट्रोल पंपावर उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच ४५ दिवस त्यामध्ये रेकॉर्डिंगची क्षमता असावी, हेल्मेट घातले नसेल तर त्याचे कारण आणि संबंधित वाहनचालकाची माहिती एका फॉर्मवर लिहावी आणि ते फॉर्म दररोज वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा करावेत, या आणि इतर बाबींचा त्यात उल्लेख आहे.

काही आरोग्याची समस्या किंवा इतर काही विशेष कारणास्तव हेल्मेट घातले नसेल तर वाहनचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे. त्यामुळे हेल्मेट न घालणं वाहनचालकांना चांगलंच महागात पडणार आहे.

नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता ही सक्ती केली जात असल्याचे पोलिसांकडून जरी सांगण्यात आले असले तरी मात्र या उपक्रमामुळे पेट्रोलपंपावर वाहनचालक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts