अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हरभऱ्याला चांगला दर मिळत आसल्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तर सरकारने नाफेडच्या माध्यमातून उभारलेल्या हमीभाव केंद्रा पेक्षा किरकोळ बाजारात शेतकरी हरभऱ्याची विक्री करत आहे.
सध्या खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली असून बाजारात देखील त्याची मागणी वाढत आहे. हरभऱ्या बरोबरच सोयाबीन, तूर यांनादेखील अधिकचा दर मिळत असल्याने बाजारात त्याची आवक वाढली आहे. हमीभावापेक्षा ही सोयाबीन, तुरीला बाजारपेठेत अधिकचा दर मिळत असल्याने.
बाजारात त्याची आवक वाढली आहे. तर हरभऱ्याला हमी भावापेक्षाही कमी भाव मिळत असताना देखील बाजारपेठांमध्ये हरभऱ्याची विक्रमी आवक झाल्याचे दिसत आहे.
हरभऱ्याची खुल्या बाजारातील विक्री 4 हजार 500 ते 4 हजार 600 असा दर मिळत आहे. तर केंद्राच्या बाजारपेठेत हाच भाव 5 हजार 230 असा ठरवून देण्यात आला आहे.
तरी ही केंद्रावरील बाजारपेठे मधील किचकट प्रक्रिया आणि पैशासाठी होणारा विलंब यामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत शेतीमालाची आवक वाढल्याने रेलचेल सुरु झाली आहे.