OPPO A1 Smartphone : भारतातील सर्वात लोकप्रिय टेक कंपनी ओप्पोचा नवीन स्मार्टफोन आता कॅबेरिया ऑरेंज, ओशन ब्लू आणि सँडस्टोन ब्लॅक कलर अशा तीन पर्यायांमध्ये सादर करण्यात येत आहे. जो तुम्ही सहज खरेदी करू शकता.
हा फोन 17 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे बजेट तयार ठेवा. कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे. कंपनी आता OPPO A1 हा फोन लाँच करणार आहे. आगामी फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन चिपसेटद्वारे समर्थित असणार आहे. ज्याची किंमत 20,690 रुपये असू शकते.
हा स्मार्टफोन Android 13-आधारित ColorOS 13 सह येत आहे. या कंपनीकडून आगामी स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हा स्मार्टफोन कॅबेरिया ऑरेंज, ओशन ब्लू आणि सँडस्टोन ब्लॅक कलर अशा पर्यायांमध्ये सादर केला आहे. स्टोरेजचा विचार केला तर या कंपनीचा Oppo A1 5G फोन 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 अंतर्गत स्टोरेजसह येतो.
किती असणार किंमत?
भारतात Oppo A1 5G हा फोन 17 एप्रिल 2023 रोजी लॉन्च होणार असून 8GB रॅम 128GB स्टोरेज असणारा हा फोन देशात 20,690 रुपयांना लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. याचे सिंगल वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सादर केले आहे. याची किंमत CNY 1,999 (सुमारे 23,800 रुपये) आहे.
आगामी Oppo चा कॅमेरा कसा असणार? जाणून घ्या
या फोनच्या डुअल रियर कॅमेरा युनिटमध्ये LED फ्लॅश पॅनेलसह 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP सेन्सरचा समावेश असणार आहे. याचा फ्रंट कॅमेरा 8MP चा असणार आहे.
जाणून घ्या वैशिष्ट्ये
कंपनीचा नवीन स्मार्टफोन 67W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये 6.71-इंच फुल एचडी + (2400 × 1080) LCD डिस्प्ले असून ज्याचा रिफ्रेश दर 120Hz पर्यंत देण्यात येत आहे, टच सॅम्पलिंग दर 360Hz आहे आणि पिक्सेल घनता 391 ppi आहे. डिस्प्ले 680 nits चे पीक लोकल ब्राइटनेस देत आहे.