Oppo F21s Pro : Oppo India आज भारतात त्याच्या लोकप्रिय F-सिरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. ब्रँडनुसार, Oppo F21s Pro सीरीज हँडसेट – F21s Pro 5G, F21s Pro 4G – आज 15 सप्टेंबर (September 15) रोजी लॉन्च केले जातील.
या फोनमध्ये मायक्रोलेन्स कॅमेरा (Microlens camera) देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. F21s प्रो सिरीजच्या कॅमेर्यासह, तुम्ही मायक्रो फोटोग्राफी (Photography) करू शकाल कारण ते 30x मॅग्निफिकेशनसह येईल.
OPPO F21s Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता
OPPO F21s Pro 5G स्टारलाइट ब्लॅक आणि डॉनलाइट गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. याशिवाय, स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये येण्याची अपेक्षा आहे – 4G प्रकार आणि 5G प्रकार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस व्हेरिएंटची किंमत 23,000 ते 24,000 रुपये असू शकते.
Oppo F21s Pro 5G चे संपूर्ण स्पेसिफिकेशन (specification)
Oppo F21s Pro 5G मध्ये 6.4-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असेल. हे ऑक्टा-कोर 2.2GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटसह 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह समर्थित असेल. याशिवाय, स्मार्टफोन Android 12 वर आधारित ColorOs 12.1 वर चालेल.
फोटोग्राफीसाठी, OPPO F21s Pro 5G मध्ये f/1.7 अपर्चरसह 64MP प्राथमिक सेन्सर, 2MP मॅक्रो आणि f/2.4 अपर्चरसह 2MP डेप्थ सेन्सरसह तिहेरी कॅमेरा सेटअप असेल. यात f/2.4 अपर्चरसह 16MP सेल्फी कॅमेरा असेल. स्मार्टफोनला 33W सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,500mAh बॅटरी मिळेल.