Oppo Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन टेक बाजारात आणला आहे. कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये म्हणजे Oppo Find X6 Pro मध्ये शानदार फीचर्स दिली आहेत.
शानदार फीचर्स आणि स्पेसिसिफिकेशनमुळे कंपनीचा हा फोन सॅमसंगशी स्पर्धा करत आहे. दरम्यान यात कंपनीने 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. क्लाउड ब्लॅक, ग्रीन आणि सिल्व्हर मून कलर पर्यायांसह तुम्हाला तो विकत घेता येईल.
कंपनीने आपल्या नवीन Oppo Find X6 Pro स्मार्टफोनमध्ये 3168×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह Quad HD+ डिस्प्ले दिला असून त्याचा स्क्रीनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. तर नवीन फोनचा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनीने त्यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 (4nm) दिला आहे. हा स्मार्टफोन Android 13 आधारित ColorOS 13.1 वर काम असून तो 12GB/16GB रॅम आणि 256GB/512GB अंतर्गत स्टोरेज पर्यायासह येतो.
याच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा कंपनीने दिला आहे. तर त्याच वेळी, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असणार आहे.
पॉवर बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच 50W Qi वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सारखे उत्तम फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, GPS/GLONASS, ड्युअल-अँटेना NFC, USB Type-C सारखे फीचर्स दिले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असून याला IP68 रेटिंग आहे म्हणजे हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर आणि डॉल्बी अॅटमॉस यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
किती आहे किंमत
या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Oppo Find X6 Pro च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5999 युआन (सुमारे 72,100 रुपये) इतकी आहे. तर 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6499 युआन (सुमारे 78,100 रुपये) इतकी आहे आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6999 युआन (सुमारे 84,100 रुपये) इतकी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन क्लाउड ब्लॅक, ग्रीन आणि सिल्व्हर मून कलर पर्यायांसह उपलब्ध केला आहे.